नाशिक

लासलगावला गणेश विसर्जन उत्साहात

लासलगाव : वार्ताहर
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ या जयघोषात पारंपरिक वाद्याच्या तालावर कांदानगरी अर्थात, लासलगाव शहरातील गणेश मंडळांनी, तसेच घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या भक्तांनी लाडक्या गणपतीला रिमझिम पावसाच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यानिमित्ताने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.
शहरात शनिवारी (दि. 6) सकाळपासूनच अनेक गणेश मंडळांनी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला होता. यावेळी विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता झेंडूच्या पाकळ्यांची उधळण करून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.गेल्या 11 दिवसांपासून गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी सकाळी क्रांती मित्रमंडळाने गणरायाचे विधिवत पूजन व आरती करून शेख मास्टर बँड पथकाच्या गजरात मिरवणूक काढून भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी वेळापूर येथील प्रतापशिव बहुद्देशीय संस्था व शिवप्रताप मित्रमंडळाच्या मुलांनी भव्य मर्दानी असे तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, भाला या खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी महिलांचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी क्रांती मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संध्याकाळी शिवसूर्य प्रतिष्ठान, दत्तनगर यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वराज्य मर्दानी आखाडा, कोल्हापूर येथील
मल्लांंनी विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून मिरवणुकीची शोभा वाढवली. लोकमान्य टिळक मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, अष्टविनायक मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, गणेशनगर मित्रमंडळ, शिवरत्न मित्रमंडळ, गोल्डन मित्रमंडळ यांच्यासह अनेक मंडळांनीदेखील ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांच्या
गजरात लाडक्या गणरायाचे
विसर्जन केले.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, मोहन पाटील, गोपनीय पोलीस कर्मचारी मंगेश डोंगरे, सुजय बारगळ व कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला
होता.

विसर्जनाच्या ठिकाणी स्वीमिंग ग्रुपचे सदस्य तैनात

लासलगाव स्वीमिंग ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे निमगाव वाकडा बंधारा, निमगाव पाट, विंचूर पाट, खडकमाळेगाव बंधारा, शास्त्रीनगर बंधारा या ठिकाणी स्वीमिंग ग्रुपचे 75 सदस्य तैनात होते. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना कुठलीही जीवितहानी होऊ नये, याकरिता स्वीमिंग ग्रुपच्या सदस्यांनी गणेशभक्तांना मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मदत केली.

ग्रामपंचायतीतर्फे कृत्रिम तलावांची व्यवस्था

लासलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नदीपात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी श्रीगणेशाचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायत हॉल, कॉलेज रोड, शास्त्रीनगर बंधारा येथे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील गणेशभक्तांनी गणपती बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन लासलगाव ग्रामपंचायतीने केलेे होते.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago