राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

खासदारांच्या कार्यशाळेत मोदी बसले शेवटच्या रांगेत

आश्चर्याचा धक्का; जीएसटी कमी केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली :
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवारी (दि. 7) संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली. पण पुढल्या रांगेत बसण्याऐवजी ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील भाजपा खासदार रवी किशन यांनी इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते सभागृहातील शेवटच्या सीटवर भाजपा खासदारांसोबत बसलेले दिसत आहेत.
भाजपा खासदार रवी किशन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा खासदारांच्या कार्यशाळेत शेवटच्या रांगेत बसले. ही भाजपा संघटनेची ताकद आहे. प्रत्येक कार्यकर्ता समान आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणांना पाठिंबा देणारा भाजपा खासदारांच्या कार्यशाळेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच जीएसटी दर कमी केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले.

कर प्रणालीत मोठी सुधारणा
अलीकडील जीएसटी सुधारणांना भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीतील एक मोठी सुधारणा असल्याचे म्हटले जात आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन कर स्लॅब रद्द करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर फक्त दोन 5 टक्के आणि 18 टक्के असे जीएसटी स्लॅब चलनात असतील. 40 टक्के नवीन कर स्लॅबला मान्यता देण्यात आली आहे. अहवालानुसार, भाजपा खासदारांची कार्यशाळा चार सत्रांमध्ये होणार आहे आणि यामध्ये उपराष्ट्रपती निवडणुकीत 100 टक्के मतदानासाठी खासदारांना प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

कल क्या होगा किसने जाना?

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये सध्या कामांची लगीनघाई सुरू आहे.…

8 hours ago

गुलामी

इतिहासात आपण भारतीय, कितीक लोकांचे आणि किती वर्ष गुलाम होतो हे आता आपल्याला चांगलेच ठाऊक…

8 hours ago

स्टारलिंकचे संकट आणि भारताची सुरक्षा भूमिका

- प्रा. राजेंद्र आढाव युक्रेनमध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा…

8 hours ago

आभासी समृद्धीचा उथळ फुगा!

- सीमाताई मराठे ज्या वयात तरुणांच्या हातात बचत, गुंतवणूक आणि भविष्याची सुरक्षितता असायला हवी, त्या…

8 hours ago

प्रचार- प्रसार प्रभाव

- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…

8 hours ago

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

9 hours ago