सिडको : विशेष प्रतिनिधी
संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आज मंगळवारी प्रस्थान ठेवणार असून, नाशिकमध्ये दिंडीचे आगमन झाल्यानंतर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक विभागातर्फे 12 जून रोजी सकाळी 6.30 पासून ते 14 जून रोजी सकाळी 11 पर्यंत वाहतुकीत विविध बदल आणि निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 यांच्या हद्दीतून पालखी मार्गक्रमण करणार असून, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड आणि पळसे गावात पालखीचा मुक्काम तसेच विसावा होणार आहे.पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 आणि 116 (1)(अ)(ब) नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करत ही वाहतूक अधिसूचना निर्गमित केली आहे.शहरात येणारी व जाणारी जड वाहने व एसटी बसेस सिन्नर फाटा मार्गे वळवण्यात येणार असून, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा आणि पोलीस वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. पालखी सोहळ्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
खालील मार्गांवर वाहतुकीस बंदी
पिंपळगाव बहुला ते सातपूर, आयटीआय सिग्नल ते मोडक सिग्नल, अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते गाडगे महाराज पुतळा मार्गे काजीपुरा चौकी, गणेशवाडी पंचवटी ते अमरधाम, मुक्तीधाम मंदिर समोरील मार्ग इत्यादी. दत्तमंदिर सिग्नल ते बिटको चौक आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिक रोड मार्गावर जड वाहने व हातगाड्यांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग असा राहील
पर्यायी मार्गांतर्गत मोडक सिग्नल, अशोकस्तंभ, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, जेलरोड, डावीकडे आम्रपालीनगरमार्गे, द्वारका टाकळी रोड, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी-पॉइंट मार्ग आदींचा समावेश आहे.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…