गुन्हे शाखा युनिट 1 ची यशस्वी कारवाई
सिडको : विशेष प्रतिनिधी
शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि सुगंधित तंबाखू (गुटखा) यांची अवैध वाहतूक करणार्या इसमावर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल 54 लाख 84 हजार 267 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 च्या पथकाला एमएच 03-सीपी 6279 यालक्रमांकाचा टाटा कंटेनर धुळे येथून कसारा येथे गुटखा घेऊन निघाला असल्याची माहिती पोलीस अंमलदारांना मिळाली होती.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशावरून पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे आदींच्या पथकाने मुंबई महामार्गावरील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ सापळा रचून कंटेनर ताब्यात घेतला. यावेळी पोलीस तपासात आरोपीने आपले नाव विजय तानाजी तुपे (रा. तुपेवाडी, जि. सांगली) असे सांगितले.
त्याच्याकडून कंटेनरसह 28 लाख 54 हजार 267 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व 26 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 54 लाख 84 हजार 267 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोहवा संदीप भांड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, नाझिमखान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, रमेश कोळी, उत्तम पवार, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे यांनी केली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…