सटाणा : प्रतिनिधी
साक्री-शिर्डी महामार्गावर सटाणा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंतनगर जवळ दुभाजकावर भल्या पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेलला सोळा टायरी ट्रक चढल्याने दुभाजकासह ट्रकचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला.
नंदुरबार येथून सोळा टायरी वाळूने भरलेला ट्रक नाशिकच्या दिशेने जात असताना सोमवारी भल्या पहाटे सटाणा शहराजवळ यशवंतनगरजवळ चालकास दुभाजकाचा अंदाज न आल्याने व या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुभाजक असल्याच्या खुणा अथवा रिफ्लेक्टर नसल्याने ट्रक दुभाजकावर चढला रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कमी असल्याने ट्रक दुभाजकावर चढला हे लवकर लक्षात आले
नाही.
चालकाने प्रसंग अवधान राखत ट्रक दुभाजकावर थांबून गाडीतून उडी मारली.
सकाळच्या सुमारास ट्रक मधून वाळू उपसून ट्रक दुभाजकावरून क्रेनच्या साह्याने खाली उतरवण्यात आला. दुभाजकावर रात्रीच्या वेळेस ट्रकचालकांची दुसरी घटना असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुभाजकाच्या आसपास व रस्त्याच्या कडेला कोणतेही रिफ्लेक्टर अथवा सूचनाफलक नसल्याने वाहन चालकांना दुभाजक असल्याचे लक्षात येत नसल्यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडतात संबंधितांनी रिफ्लेक्टर अथवा सूचनाफलक लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…
सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…
सिडको : विशेष प्रतिनिधी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्या महिलेच्या घरात…