नाशिक : प्रतिनिधी
बोरगड बुस्टर पंपिंग स्टेशनची दैनंदिन देखभाल, यंत्रसामग्रीची नियमित तपासणी, आवश्यक दुरुस्ती आणि सुरळीत पाणीपुरवठा राखण्यासाठीच्या 49 लाखांच्या खर्चाला स्थायी सभापतींनी मंजुरी दिली. पुढील तीन वर्षे संबंधित संस्थेकडे हे काम असणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत बोरगड बुस्टर पंपिंग स्टेशनची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी 49 लाख 45 हजार 842 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव जादा विषयांमध्ये घेऊन मंजूर करण्यात आला.
या कामासाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. मुदतीत तीन निविदा प्राप्त झाल्या. तांत्रिक छाननीनंतर दोन निविदाधारक पात्र ठरले.
आर्थिक निविदेत मे. ई सोल्यूशन सर्व्हिसेसने सर्वांत कमी दर सादर केला. प्रशासनाने दर कमी करण्यासाठी वाटाघाटी केल्यानंतर संबंधित संस्थेने गणवेश, सुरक्षा साहित्य, स्वच्छतेचे साहित्य, प्रशासकीय खर्च व इतर बाबींसाठीचा मासिक खर्च 18 हजार 551 रुपयांवरून 17 हजार 350 रुपयांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शविली.
सुधारित दरानुसार किमान वेतन, भत्ते आणि इतर आवश्यक खर्चासह 36 महिन्यांसाठी एकूण 49 लाख 45 हजार 842 रुपये
खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने हा खर्च पाणीपुरवठा केंद्रांच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्ती या लेखाशीर्षातून करण्यास मान्यता दिली आहे.
₹49 lakh expenditure for pumping station maintenance; ‘Standing Committee’ approval.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…