नाशिक

कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी

मुख्यमंत्री फडणवीस यांची त्र्यंबकेश्वरला जाहीर सभा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांनी शहर सुसज्ज करणार असून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपये आणले. त्यामधून सिमेंटचे रस्ते, घाट, पार्किंग यांसारख्या सुविधा निर्माण करणार आहोत. त्यासाठी कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि नुकसान झाले तर त्याचा मोबदला देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले आणि इगतपुरी उमेदवार मधुमालती मेंद्रे यांच्यासह दोन्ही नगर परिषद प्रभागातील भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारासाठीच्या सभात ते बोलत होते.
भाजपाने राज्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील जाहीर सभेने केला. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रथम ते कुशावर्तावर आले. तेथून त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले व त्यानंतर जव्हार रोडवरील सभास्थानी पोेहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात करोडो लोक येणार आहेत व त्यासाठी त्र्यंबक नगरी सुसज्ज ठेवायची आहे. पिण्याचे पाणी, कचरा विल्हेवाट, सांडपाण्याचा निचरा, शिक्षण आरोग्याचे असे सर्व प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचे जीवनमान वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साधू महंत नियोजनात समाविष्ट करून घेत कुंभाचे आयोजन संत आणि महंत करणार, आखाडे करणार आहेत असे जाहीर केले. सभेच्या प्रारंभी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभेमध्ये मंचावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आ.सीमा हिरे, आ. राहुल ढिकले यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले, इगतपुरीच्या उमेदवार मधुमालती मेंद्रे यांसह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित राहिले.यांसह साधू महंतांची उपस्थिती लाभली.

उपमुख्यमंत्री शिंदेंची सिन्नर, सटाणा, मनमाडला सभा
नाशिक : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वरला सभा झाली. सटाणा व मनमाड व सिन्नर येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. नगरविकास खात्याचा कारभार आपल्याकडे असून, विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी तिन्ही ठिकाणच्या सभेत मतदारांना दिली. शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदी यांनी केले.

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago