नाशिक

रुग्णवाहिकेतून दिला दहावीचा पेपर

सिडको : विशेष प्रतिनिधी
अपघातानंतरही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत उपेंद्रनगर येथील रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलचा दहावीचा विद्यार्थी हर्षल ज्ञानेश्वर चौधरी याने सायन्स-2 विषयाचा पेपर थेट रुग्णवाहिकेतून रायटरच्या मदतीने पूर्ण केला. प्रतिकूल परिस्थितीतही परीक्षा देण्याचा निर्धार कायम ठेवल्याने त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हर्षलचा परीक्षेच्या आदल्या दिवशी अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशा परिस्थितीतही त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार सोडला नाही. कुटुंबीय तसेच शाळेच्या शिक्षकांनी त्याला यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. विशेष परवानगी घेऊन 13 मार्च रोजी जनता विद्यालय परीक्षा केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार हर्षलने रायटरच्या मदतीने सायन्स-2 विषयाचा पेपर पूर्ण केला. उपचार सुरू असतानाही त्याने दाखवलेली चिकाटी पाहून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.
या प्रक्रियेसाठी रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलच्या प्राचार्या डॉ. स्मिता चौधरी यांनी पुढाकार घेत नाशिक बोर्डातील अधिकार्‍यांशी तसेच संबंधित परीक्षा केंद्राशी समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवली. यावेळी अध्यक्ष सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, परीक्षा समितीप्रमुख रूपेश आवारे आणि शाखाप्रमुख हेमंत पगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच जनता विद्यालय केंद्राचे संचालक अण्णासाहेब ठाकरे, उपकेंद्र संचालक अरुण दातीर व शैलेश देवरे तसेच सह परीरक्षक प्रदीप ठाकरे यांनीही विद्यार्थ्याच्या परीक्षेसाठी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. याशिवाय शाळेच्या निवेदिता महाजन, सोनाली कारंडे आणि मृणालिनी गोस्वामी या शिक्षकांनी विद्यार्थ्याला मानसिक व शैक्षणिक आधार दिला. शाळा प्रशासन व शिक्षकांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल हर्षलचे पालक किरण चौधरी यांनी आभार मानले. उपचारादरम्यान सहकार्य केल्याबद्दल डॉ. अजिंक्य देसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

10th grade paper delivered from ambulance

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago