हवाईदलाची ताकद वाढणार : केंद्राकडून कराराला मंजुरी

नवी दिल्ली :
फ्रान्सकडून आणखी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या दिशेने भारताने निर्णायक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने फ्रान्सकडून नवीन राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या कराराला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम होणार आहे.
केंद्र सरकारने 114 नवीन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ‘अललशिींरपलश ेष छशलशीीळीूं’ जारी केली आहे. हा करार अंदाजे 3.25 लाख कोटींचा असणार आहे. यामधील 2.5 लाख कोटी रुपये विमानांसाठी खर्च केले जातील, तर उर्वरित रक्कम शस्त्रास्त्र, स्पेअरपार्ट्स आणि लॉजिस्टिक सपोर्टवर खर्च केली जाईल. दरम्यान, या करारामुळे हवाईदलाच्या स्क्वॉड्रनची संख्या वाढण्यासह भारताचा धोरणात्मक फायदा लक्षणीयरीत्या मजबूत होईल, असे म्हटले जात आहे.
केंद्र सरकारने फक्त लढाऊ विमानांवरच नव्हे, तर देशाची सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यासाठी सहा झ-8ख सागरी गस्त विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याचा खर्च अंदाजे 28 हजार कोटी रुपये इतका आहे. यासह हाय एल्टीट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टमवर जवळपास 15 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. या सिस्टम गुप्तचर, देखरेख आणि टोही ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि भारतीय नौदलाच्या अँटी-सबमरीन क्षमतांना एक नवीन चालना देतील.

राफेल विमानांची एकूण संख्या 176 इतकी होणार

114 राफेल लढाऊ विमानांपैकी 18 पूर्णपणे तयार होऊन फ्रान्समधून भारतात येतील, तर उर्वरित 96 भारतात तयार केली जाणार आहेत. ही लढाऊ विमाने तयार करण्यासाठी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन भारतीय खासगी क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करेल. दरम्यान, या करारानंतर, भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात राफेल विमानांची एकूण संख्या 176 होईल, ज्यामध्ये 36 जुनी, 114 नवीन आणि 26 भारतीय नौदलासाठी असतील. राफेलची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याची अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आहे.

114 Rafale aircraft in India’s fleet

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्थखात्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

9 minutes ago

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी समांतर गंगापूर रोड अर्थात स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे मार्ग या महत्त्वाकांक्षी…

16 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026 मेष : जबाबदार्‍या वाढतील या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…

20 minutes ago

गोदाकाठी सामूहिक शंखनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन…

29 minutes ago

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago