राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात

नवी दिल्ली : प्रतिनिधी
सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या दोन आठवड्यात देशातील 211 शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 1 ते 13 रुपये प्रतिकिलोने कमी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा यासह अनेक मोठ्या राज्यांमध्ये कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत. याशिवाय, पहिली कांदा एक्सप्रेस 18 ऑक्टोबरला त्रिपुरातील अगरतळ्यात पोहोचणार आहे. तिथे कोलकाता, दिल्ली, चेन्नई, लखनौ, वाराणसीप्रमाणेच सरकारी यंत्रणांमार्फत 35 रुपये किलोने कांदा विक्री केली जाणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, दोन कारणांमुळे दरात घसरण झाली आहे नव्या खरीप कांद्याची आवक वाढली आहे. यंदा खरीप कांद्याचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा 5% जास्त आहे आणि पीक स्थिती चांगली आहे. सरकारचा बफर स्टॉक निर्णय ग्राहकांसाठी उपयुक्त ठरला. प्राइस स्टॅबिलायझेशन फंड (पीएसएफ) अंतर्गत सरकारने साठवलेला कांदा बाजारात सोडला जात आहे.

दिवाळीपर्यंत कांद्याचे दर आणखी स्थिर
सरकारने यंदा 1.21 लाख टन बफर स्टॉक तयार ठेवला असून, गेल्या वर्षी 14 रेकमधून 12 हजार टन, तर यंदा आतापर्यंत 86 रेकमधून 88 हजार टन कांदा 16 मोठ्या शहरांमध्ये पाठवला आहे. दिवाळीपर्यंत कांद्याचे दर आणखी स्थिर राहतील, असा विश्वास ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 minute ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

25 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

31 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

37 minutes ago