नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ 19 मे 2025 रोजी होणार असून, विद्यार्थ्यांसाठी प्रथम फेरीचा सराव सत्र 19 मे सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. हे सत्र 20 मे संध्याकाळी सहापर्यंत चालेल. या कालावधीत विद्यार्थी माहिती भरून प्रॅक्टिस करू शकतात, परंतु ही प्रक्रिया केवळ सरावासाठी असेल.
प्रवेश वाटप व गुणवत्ता यादी
गुणवत्ता यादीवर हरकतींचे ऑनलाइन निराकरण करून अंतिम मंजुरी दिली जाईल. त्यानंतर 6 जून रोजी सकाळी 10 वाजता शाळानिहाय वाटप यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये वाटप तपशील पाहता येणार आहे. ज्यांना वाटप झाले आहे, त्यांनी ‘झीेलशशव षेी अवाळीीळेप’वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
फेरी 2 साठी रिक्त जागा व नोंदणी सुरू
14 जून रोजी दुसर्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. ही यादी कोटा जागांसह असेल. नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असून, विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
21 मेपासून प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू
21 मेपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज सादर करता येणार असून,
ते आपल्या पसंतीनुसार 1 ते 10 पर्यंत उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंद करू शकतील.
अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल.
कोट्यांंतर्गत प्रवेश 6 जूनपासून
व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोटा यांतील प्रवेश प्रक्रिया 6 जूनपासून सुरू होणार आहे.
सर्व शाळांनी प्रवेशासाठी फी केवळ डिजिटल माध्यमातून स्वीकारावी,
अशी स्पष्ट सूचना संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…