नाशिक शहर

थकबाकी वसुली सुसाट , 144 कोटी जमा

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीचे शंभरटक्के उदिष्ट दिले होते. त्यानंतर करसंकलन विभाग झपाटयाने कामाला लागला असून तब्बल पालिकेने यंदा तब्बल 144 कोटींची वसुली केली आहे. ही वसुली मागील वर्षीपेक्षा अधिक असून गेल्यावेळी थकबाकीची वसुली 115 कोटींवर अडकली होती. परंतु पालिका आयुक्त ॲक्शन मोडवर येताच थकबाकी वसुली सुसाट झाल्याचे चित्र आहे.

करसंकलन विभागाकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी आजमितिला 115 कोटी घरपट्टी वसूल झाली होती. यंदा हे प्रमाण 144 कोटींवर पोहचली आहे. तर पाणीपट्टी वसुली गतवर्षी 40 कोटी इतकी होती. यंदा हीच वसुली 42 कोटींच्या पुढे गेली आहे. थकबाकी वसुलीसाठी 270 कर्मचार्यांची आवश्यकता असताना कर संकलन विभाग अवघे नव्वद कर्मचार्ऱ्यांवर या मोहिमेची जबाबदारी आहे. यापूर्वी पालिकेने थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ, सूचनापत्र पाठवणे, नोटिसा धाडणे, जप्तीचे वारंट बजावणे याद्वारे करसंकलन विभाग उदिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे दीडशे कोटी तर पाणीपट्टी वसुलीचे 75 कोटींचे उदिष्ट दिले आहेत. त्यापैकी घरपट्टीचे 144 कोटी थकबाकी वसूल केली आहे. गतवर्षी हे प्रमाण 115 कोटी इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 28 कोटींनी जादा आहे. तर पाणीपट्टीचे थकबाकी वसुली 42 कोटी 65 लाखांवर पोहचली आहे. गतवेळेस हे प्रमाण 40 कोटी 30 लाख इतके होते. सध्यस्थितीत दोन कोटी 35 लाखांनी वसुली अधिक आहे. आयुक्तांनी दिलेले उदिष्ट पूर्ण करताना घरपट्टीचे सहा कोटी तर पाणीपट्टिचे 32 कोटी वसूल करण्यासाठी करसंकलन विभागाला घाम गाळावा लागणार आहे. अपुरे मनुष्यबळातही दमदार कामगिरी करत करसंकलन विभाग वसुलीत सुसाट झाल्याचे दिसत आहेे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असून आयुक्तांनी यंदा घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीचे शंभरटक्के उदिष्ट गाठताना कर संकलन विभागाला मात्र विशेष परिश्रम घ्यावे लागत आहे.  वेळोवेळी आवाहन करुनही थकबाकीदार मालमत्ता कर अदा करत नसल्याने करसंकलन विभागाने 337 जणांना मालमत्ता जप्तीचे वारंट जारी केले आहे. कारवाईच्या भितीपोटी 67 जणांनी पूर्ण व अंशत: 49 लाख 96 हजारांची थकबाकी अदा केली आहे.

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago