नाशिक

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेला महिनाभर झालेल्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील धरणसाठ्यांत 47.42 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 56.07 टक्के साठा आहे. विशेष म्हणजे, गंगापूर धरणातून विसर्गही सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीकडे एक लाख 44 हजार 53 क्यूसेक विसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यातील सात धरणांत 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.
दरम्यान, जूनमध्ये नियोजित वेळी पाऊस दाखल झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांच्या जवळपास 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरीदेखील समाधान व्यक्त करत आहेत. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात सुरू असणारा पाऊस खरीप पिकांसाठी समाधानकारक असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत.

जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जून महिन्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जूनमधील 29 तारखेपर्यंत जिल्ह्यात 174.4 मिलिमीटर अपेक्षित पाऊस असताना, प्रत्यक्षात 216.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 42 मिलिमीटर पाऊस अधिक झाल्याने जिल्ह्यातील धरणांत समाधानकारक साठा शिल्लक आहे.

टँकरफेर्‍यांमध्ये घट

जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे टँकरफेर्‍यांत घट झाली आहे. जिल्ह्यातील 116 गावे व वाड्यांतील 57 हजार 465 लोकसंख्येला 23 टँकरद्वारे 56 टँकरफेर्‍यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्यात जिल्ह्यात 399 टँकरफेर्‍यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्याच्या मध्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. जूनमध्ये मॉन्सून दाखल झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यांत वाढ होऊन टँकरफेर्‍यांत घट झाली आहे.

जायकवाडीला 12 टीएमसी पाणी

जिल्ह्यातील धरणांतून गेल्या 12 दिवसांपासून 12 हजार 451 दलघफू विसर्ग जायकवाडी धरणाकडे झालेला आहे. अंदाजे 12 टीएमसी पाणी रवाना झाले आहे. आत्ताही गंगापूर धरणातून 1,360 क्यूसेक विसर्ग, तर दारणातून 1,751 क्यूसेक, तर नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 7,320 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

19 hours ago