टोमॅटोला सरासरी 200 रुपये प्रति कॅरेट भाव
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली येथील उपबाजार आवारात गुरुवारी (दि.9) टोमॅटो लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे 15 हजार कॅरेट मालाची आवक झाली. शेतकर्यांना सरासरी 200 रुपये प्रति जाळी भाव मिळाला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजारात सभापती गणेश घोलप यांच्या हस्ते टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपसभापती सिंधुताई कोकाटे, संचालक प्रकाश तुपे, सुनील चकोर, रवींद्र शेळके, अनिल शेळके, नवनाथ नेहे, श्रीकृष्ण घुमरे उपस्थित होते. सचिव विजय विखे, कर्मचारी दिलीप पाटोळे, सोमनाथ चव्हाणके, संजय वाळूंज, अर्जुन भांगरे आदी यांनी उपस्थित राहून लिलाव कामकाजात सहाय्य केले.
टोमॅटो शेतमालाची खरेदी करण्यासाठी अनिल हारक, दत्ता हारक, शौकत बागवान, शौकत सरदार बागवान, बाळासाहेब दळवी, लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी दत्तू गडगे, अमोल खोल्लम, प्रमोद यादव, अण्णा हारक, निवृत्ती चव्हाणके, शालिमार ट्रेडिंग कंपनी, श्रीगणेश ट्रेडिंग कंपनी, संतोष जोशी, नितीन आरोटे आदी व्यापार्यांनी लिलावात सहभाग घेतला. याप्रसंगी सरपंच साहेबराव वाजे, रमेश गायकवाड, पंढरीनाथ ढोकणे, निवृत्ती हारक, केरू पवार, दत्तू आरोटे, कैलास वाजे, केशव कोकाटे, बाळू भोर, विशाल कानडे, तुषार मोजाड, विष्णुपंत वाजे, बाजीराव वाजे, नारायण पाडेकर, पुंजा हारक, सोपान दिवटे आदी उपस्थित होते. शेतकर्यांनी आपल्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेती बांधावर किंवा शिवारमापाने टोमॅटो शेतमालाची विक्री न करता टोमॅटो पांढुर्ली उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती व संचालक मंडळाने केले आहे.
आठवडाभर लिलाव आणि रोख पेमेंट
पांढुर्ली उपबाजारात सोमवार ते रविवार असे सप्ताहातील सर्व दिवस टोमॅटो शेतमालाचे लिलाव सुरू असणार आहे. शेतकरी बांधवांना आपल्या टोमॅटो शेतमाल विक्रीचे लिलाव झाल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात पेमेंट अदा केले जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना खरेदीदार व्यापार्यांकडून पेमेंट अदा केले जाणार नाही, त्याची तक्रार तत्पर बाजार समितीकडे करावी, असे आवाहन सभापती व संचालक मंडळाने शेतकर्यांना केले.