नाशिक

कंटेनरमधून 15 वर्षीय मुलाचे अपहरण

सटाणा ः प्रतिनिधी
पिंगळवाडे येथील वाघदर शिवारात राहणार्‍या पंधरा वर्षीय मुलाला अज्ञात इसमाने काहीतरी कारणाने पारसमणी रोडलाइन्स नाव असलेल्या कंटेनरमध्ये बसून पळून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भामरे यांचा मुलगा ओम संजय भामरे यास घरी ठेवून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेला संजय भामरे यांच्या आईने मोबाइलवर फोन करून कळवले की ओम घरी नाही. त्यानंतर भामरे यांनी मित्रांकडे विचारपूस केली असता सगळ्यांनी ओम आमच्याकडे आलाच नाही, असे सांगितले, त्यानंतर संजय भामरे शोध घेऊ लागले. शोध घेताना हॉटेल शाहू व तेथील पेट्रोलपंपावर गेले असता पेट्रोलपंपाचे पाठीमागे मुलगा ओमची सायकल दिसून आली. पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यात ओम भामरे, पारसमणी रोडलाइन्स नाव असलेले कंटेनरमध्ये बसून जाताना दिसून आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago