सहा महिन्यांत 19 हजार नवीन मालमत्तांचा शोध

मनपाला वीस कोटींचे उत्पन्न

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या कर संकलन विभागाने शहरातील ज्या मालमत्तांची नोंद मनपाच्या दप्तरी नाही, अशा मालमत्तांचा शोध गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. त्यानुसार 1 एप्रिल ते सप्टेंबर 2025 या सहा महिन्यांत शहरातील तब्बल 19 हजार मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कराच्या कक्षेत आणले. यामुळे मनपाच्या तिजोरीत वीस कोटींचा महसूल जमा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था, आर्यन सर्व्हिसेस, ऋषिकेश इलेक्ट्रिकल्स या संस्थेकडून नवीन मालमत्तांचा शोध घेतला जातो आहे.

शहराचा विकास झपाट्याने होत आहे. नव्या मिळकतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. दरम्यान, काही मालमत्तांची नोंद महापालिकेकडे न केल्याने सदर मिळकतींचा महसूल मनपा प्रशासनाला मिळत नसल्याचे चित्र आहे. परंतु, ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षीपासून करसंकलन विभागाने नवीन मालमत्ता आकडेवारीची नगररचना विभागाकडून माहिती घेत अशा मालमत्तांना कराच्या कक्षेत आणले जात आहे. चालू वर्षासाठी तीस हजार मालमत्तांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी करसंकलन विभागाने सहा महिन्यांत 19 हजार मालमत्तांना कराच्या कक्षेत आणले आहे. याद्वारे मिळकतदारांकडून 20 कोटींचा महसूल वसूल करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नव्या मालमत्तामुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून पंधरा ते वीस कोटी उत्पन्न अधिकचे मिळणार आहे. सद्यस्थितीत नगररचना विभागाकडून जाणारे बांधकाम परवाने शुल्क, करसंकलन विभागाकडून होणारी घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली व केंद्राकडून जीएसटीपोटी मिळणारा परतावा या उत्पन्नावरच महापालिकेचे आर्थिक गणित आहे. परंतु नवीन मालमत्ता शोधून त्या कराच्या कक्षेत आणल्या जात असल्याने त्याचा आर्थिक हातभार पालिकेला
लागत आहे.

निवडणूक कामामुळे परिणाम

नाशिक महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. दरम्यान, या निवडणुकीची मनपा प्रशासनाकडून सप्टेंबरपासून तयारीला सुरुवात केली होती. या प्रक्रियेसाठी तीन ते चार महिन्यांचा अवधी गेल्याने याचा वसुलीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सुमारे एकोणावीस हजार नव्या मालमत्ता कराच्या कक्षेत आल्याने महापालिकेला तिजोरीत वीस कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्च महिन्याअखेर नवीन मालमत्तांसह रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

19 thousand new properties discovered in six months

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *