माजी-विद्यमान 21 संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हा; ठेवीदारांत खळबळ
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील चास येथील त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन 2010 ते 2025 या कालावधीत 2 कोटी 31 लाख 15 हजार 330 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार व अपहार झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी प्रमाणित लेखापरीक्षक रुस्तम सारंगधर कपाटे (61, रा. कानडी मळा, मुरलीधरनगर, सिन्नर) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात माजी व विद्यमान संचालक मंडळातील 21 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, सन 2010 ते 2023 या कालावधीत कार्यरत असलेले चेअरमन जगन्नाथ वामन सहाणे (रा. प्रवरा कॉर्नर, अकोले, जि. अहिल्यानगर), व्हाइस चेअरमन मच्छिंद्र मुरलीधर खैरनार (रा. चास, ता. सिन्नर), संचालक अण्णासाहेब सोपान खैरनार, रघुनाथ वामन सहाणे, रामदास रंगनाथ भाबड, सुदाम श्रीहरी सहाणे, सूर्यभान बाबूराव देशमुख, गुलाब गंगागीर गोसावी, दादा भाऊराव गायकवाड (सर्व रा. चास, ता. सिन्नर), संचालिका कांता भागवत कातोरे (रा. जगदंबा कॉलनी, मालदड रोड, संगमनेर, जि. अहिल्यानगर), संचालिका कमळाबाई बाळासाहेब गडाख (रा. चास, ता. सिन्नर) तसेच व्यवस्थापक सुरेश तुकाराम जगधने (रा. गर्दनी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांचा संशयितांमध्ये समावेश आहे. तसेच सन 2023 ते 2025 या कालावधीत कार्यरत असलेले चेअरमन शिवाजी विठोबा खैरनार (रा. चास, ता. सिन्नर), व्हाइस चेअरमन नंदकुमार हरिश्चंद्र देशमुख (रा. चास, ता. सिन्नर), संचालक सोमनाथ माधव भाबड, उत्तमराव कारभारी बिडगर, राजेंद्र भागीनाथ खैरनार, पोपट सोपान खैरनार (सर्व रा. चास, ता. सिन्नर), संचालक रामनाथ हरी लोहकरे (रा. कासारवाडी, ता. सिन्नर) तसेच संचालिका मंगल बाळासाहेब देशमुख व कल्पना उत्तम गायकवाड (रा. चास, ता. सिन्नर) यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. संबंधितांनी संगनमत करून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याने ठेवीदारांच्या हिताला फटका बसल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सरोवर करीत आहेत.
2.31 crores embezzled from Chas’ Trimurti Patsanstha
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…