नागरिकांचे महावितरण कंपनीला निवेदन
सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर, नरहरीनगर व कडवेनगर भागात महावितरणच्या वीज वितरण बॉक्सची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून, तत्काळ दुरुस्तीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन नाशिक उपाध्यक्ष चेतन चंद्रकांत फेगडे यांनी केली आहे. यासंदर्भात अतिरिक्त उपअभियंता, उपविभाग पाथर्डी कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित भागातील वीज वितरण बॉक्सचे झाकण तुटलेले असून, आतील विद्युत तारा उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट, विद्युत धक्का लागणे किंवा आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, पादचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात
आली आहे.
वितरण बॉक्स अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून, वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात
आली आहे.
वीज वितरण बॉक्सची तत्काळ दुरुस्ती करून सुरक्षित कव्हर बसवावे, अन्यथा दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर चेतन फेगडे यांच्यासह पूजा गुप्ता, विशाल सूर्यवंशी, मनीषा जोशी, रमेश शेळके, जयश्री आव्हाड, भरत सावंत, संतोष भंगाळे, रामप्रकाश विश्वकर्मा, लीलावती विश्वकर्मा आदी नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
Mahavitaran box has become dangerous
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…