नाशिक

पेठरोडच्या सहा किमी रस्ता दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च

नागरिकांनी रस्त्यावर उतरत केले होते आंदोलन
नाशिक :  प्रतिनिधी
पेठ रात्याची दयनीय अवस्था झालेली असताना, त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यावधीचा खर्च अनावश्यक कामावर केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशीनी करत काही दिवसापूर्वी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडले होते. याप्रकरणी नागरिकांनी पालिकेला वारंवार निवेदन देऊनही त्याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात होते. दरम्यान नागरिकांच्या आंदोलनानंतर जागे झालेल्या मनपाने स्मार्ट सिटी कंपनीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्मार्ट कंपनीने  पन्नास कोटी खर्चून रस्ता दुरुस्ती करणार असल्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान या कामाला उशीर होण्याची शक्यता असल्याने आता पालिकाच सहा किमी रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन कोटी खर्च करणार आहे. तसेच यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने पेठरोड वासियांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते.पेठरोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्यात आला. स्थानिकांनी नागरिकांनी नाशिक मनपा प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देवुन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून नागरिकांच्या निवेदनाला सातत्याने केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला होत‍ा. अखेर महापालिकेने जागे होत रस्ता दुरुस्तीचे काम स्मार्ट सिटिने करावे असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबत स्मार्ट सिटीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या बैठकित निर्णय घेतला जाणार आहे.पण या प्रक्रियेला होणार उशीर पाहता बांधकाम विभाग दोन कोटी तीस लाख रुपये खर्च करुन हा रस्ता खड्डेमुक्त करत त्याची डागडुजी करणार आहे. महापालिका हद्दितील पेठरोडचा सहा किलोमीटरचा रस्ता पुर्णपणे उखडला असून बांधकाम विभाग दोन कोटी तीस लाख रुपये खर्च करुन डागडुजी करणार आहे. त्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली असून निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
पेठरोडचा महापालिका हद्दीतील रस्त्यावर खड्डेच खड्डे पहायला मिळत आहे. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे
Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago