नाशिक

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध भागातील नागरिकांना कमी दाबाने होणार्‍या पाणी टंचाईचा सामना गेल्या काही दिवसापासून करावा लागतो आहे. दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बारा टॅकरच्या माध्यमातून पाण्याच्या तक्रारी आहे. त्या भागात पाणी पुरवले जात आहे. एकुण 80 हून अधिकच्या फेर्‍या बारा टॅकरच्या माध्यमातून केल्या जात आहेत. पुढच्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पंचवटी, जेलरोड, मखमालाबाद, आडगांव, पार्थडी फाटा, म्हसरुळ्, गंगापूर गांव, चांदशी, नांदुरनाका या भागातील नववसाहतीत कमी दाबाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न गहन बनला आहे. परिणामी नागरिकांकडून पाण्याच्या टॅकरची मागणी होत आहे. मनपाचे सहा व खासगी सहा असे एकुण बारा टॅकर सध्या सुरु आहेत.
शहरात एकीकडे कमी दाबामुळे नागरिकांना पाणीटंचाइला सामोरे जावे लागत असून दुसरीकडे मात्र जुने नाशिक, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, कामटवाडेसह विविध भागात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे मात्र महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाइ होत नसल्याचे चित्र आहे. शहराचा विस्तार वाढला असून त्या प्रमाणात जलकुंभाची क्षमता वाढलेली नाही. त्यामुळे शहरातील विविध भागात बारा टॅकरच्या माध्यमातून 80 फेर्‍या सुरु आहे. पुढच्या काही दिवसात टॅकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेने जलसंपदाकडे 6100 दलघफू पाण्याचे आरक्षण मागितले असता ते फेटाळत 5300 दलघफू पाणी मंजूर केले आहे. यामुळे 31 जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. जलसंपदाने मृतसाठ्यातील सहाशे दलघफूपाणी उचलण्याची परवानगी दिली आहे. मात्र धरणाची पातळी 598 मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागेल. अन्यथा मृत साठ्यातील पाणी उचलता येणार नाही. सध्या गंगापूर धरणात पुरेसे पाणी असले तरी

शहरात बारा टॅकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आहे. पुढच्या काही दिवसांत टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठाकेला जातो आहे.
-रविद्र धारणकर, अधीक्षक
अभियंता पाणीपुरवठा, मनपा

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago