नाशिक

पहिल्याच दिवशी 20 वाहनचालक नजरकैदेत!

आयुक्तालयाची ई-चलन मोहीम; सिग्नल तोडणे पडले महागात

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाढती बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई-चलन मोहिमेचा पहिल्याच दिवशी प्रभावी परिणाम दिसला. पहिल्या दिवशी वीस वाहनचालकांवर तत्काळ कारवाई करण्यात आली.
दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या सात तासांत शहरातील विविध चौकांवरील हाय-रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत सहाशेहून अधिक नियमभंग नोंदवले गेले. त्यांपैकी नियंत्रण कक्षातून 20 वाहनधारकांना तत्काळ ई-चलन पाठवण्यात आले. चलनाचा संदेश मिळताच अनेक वाहनचालकांनी चौकशीसाठी आयुक्तालयात धाव घेतली.
20 फेब्रुवारीपासून शहरातील 40 प्रमुख सिग्नलवर हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे ई-चलन प्रणाली लागू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत 23 वाहनचालकांवर डिजिटल पुराव्यांच्या आधारे कारवाई झाली.
सीसीटीव्हीत सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, ट्रिपल सीट, अनधिकृत यू-टर्न, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावणे, तसेच मोबाइलवर बोलत वाहन चालवणे असे प्रकार स्पष्टपणे नोंदले गेले. संबंधित वाहन क्रमांकावर दंडाचा संदेश पाठवून कारवाई करण्यात आली. पोलीस नाहीत या समजुतीवर नियम मोडणार्‍यांना तंत्रज्ञानाने थेट गाठले, असे चित्र दिसले.
यापूर्वी वाहतूक कारवाई मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळावर अवलंबून होती. मात्र, नव्या प्रणालीमुळे 24 तास नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जात असून, फोटो व व्हिडीओ स्वरूपातील डिजिटल पुरावे तत्काळ प्रणालीत नोंदवून ई-चलन जारी केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 40 प्रमुख चौक नजरकैदेत आले असून, पुढील काळात या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

येथे कारवाई

सरकारवाडा पोलीस ठाणे ः सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरण तलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर. गंगापूर पोलीस ठाणे ः एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल. भद्रकाली पोलीस ठाणे ः खडकाळी. मुंबई नाका पोलीस ठाणे ः गडकरी चौक, नागजी चौक, मुंबई नाका सर्कल. पंचवटी पोलीस ठाणे ः पेठ नाका, काट्या मारुती चौक, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल नाका, तारवालानगर चौफुली, नवीन मार्केट चौक. म्हसरूळ पोलीस ठाणे ः मेरी चौफुली, राऊ हॉटेल. आडगाव पोलीस ठाणे ः नांदूर नाका, मिरची सिग्नल (कैलासनगर). सातपूर पोलीस ठाणे ः आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी-पॉइंट, महिंद्रा सर्कल. अंबड पोलीस ठाणे ः त्रिमूर्ती चौक. नाशिकरोड पोलीस ठाणे ः विहितगाव टी पॉइंट, बिटको चौक, सिन्नर फाटा, उपनगर पोलीस ठाणे ः दत्तमंदिर.

20 drivers under house arrest on the first day!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago