नाशिक

राष्ट्रीय लोकअदालतीत 3 हजार 762 प्रकरणे निकाली

64 कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 9 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 3 हजार 762 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली. लोकअदालमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण 49 पॅनेलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पॅनेलप्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रोकडे यांच्या मार्गदर्शखाली कामकाज केले. दावा दाखपूर्व प्रकरणांमध्ये एकूण 39 हजार 598 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 214 प्रकरणे निकाली निघाली असून, रक्कम रुपये 3 कोटी 15 लाख 64 हजार 478 इतकी वसुली झाली. अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणे मिळून एकूण 3 हजार 762 प्रकरणांचा निपटारा होऊन एकूण रूपये 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 इतके शुल्क झाली. या रकमेची तडजोड रक्कम समाविष्ट आहे.

* परक्राम्य संलेख अधिनियम, कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 473 प्रकरणे.
*मोटार अपघात प्रकरणे- 156 प्रकरणे
*कामगारविषयक- 1 प्रकरण
*कौटुंबिक वादातील प्रकरणे- 32 प्रकरणे
*फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 200 प्रकरणे
*इतर – 2900 प्रकरणे

मोटार वाहनचालकांना दिलासा

नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 2 हजार 487 मोटार वाहन प्रकरणामध्ये 354 प्रकरणे निकाली निघाली असून, सदर वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

3 thousand 762 cases disposed of in National Lok Adalat

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago