चांदवड लासलगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात ५ मजूर जखमी

 

लासलगाव:  प्रतिनिधी

चांदवड कडून लासलगावच्या दिशेने येत असताना विंचूर प्रकाशा मार्गावर गायकर पेट्रोल पंपा जवळ प्रवासी वाहनाच्या झालेल्या अपघातात ५ मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी प्रवासी वाहन क्रूझर गाङी क्रमांक MP20TA0653 या वाहनाने भुराकुवा मध्ये प्रदेश येथील वीस मजूर कामासाठी नारायणगाव पुणे या ठिकाणी घेवुन जात असतांना लासलगाव चांदवङ रोङ वरील गायकर पेट्रोल पंपाजवळ सायकलने लासलगावकडे जाणाऱ्या शाळकरी मुलास वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचा गाङीवरील ताबा सुटुन सदर क्रुझर गाडीने तीन पलट्या मारुन अपघात झाल्याची घटना घडली.

या गाडीत ५ मजुर जखमी झाले असुन चालकासह काहींना दुखापत झाली आहे.अपघात होताच परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीस धावून आले.जखमींना तीन रुग्णवाहिकां द्वारे लासलगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर खाजगी दवाखण्यात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *