इगतपुरी: प्रतिनिधी
तालुक्यातील भावली धरणात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली, तहसीलदार इगतपुरी याचेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जि. नाशिक, ता. इगतपुरी, भावली धरण येथे नाशिक रोड येथील पर्यटक 3 मुली व 2 मुले धरणात बुडून मृत पावले आहेतअनस खान दिलदार खान,-, वय 15 वर्ष., नाझिया इमरान खान- वय – 15 वर्ष. मीजबाह दिलदार खान, वय – 16 वर्ष.(हनीफ अहमद शेख वय – 24 वर्ष, ईकरा दिलदार खान, वय -14 वर्ष, सर्व राहणार गोसावी वाडी जेल रोड नाशिक असे त्यांचे परिवारातील .काजल इमरान खान व अमीना अहमद शेख तसेच 2 लहान मुले फरहान व सुलतान .. दुपारी साडेतीन वाजता नाशिक येथील हनीफ शेख यांचे ऑटो रिक्षा ने भावली डॅम येथे फिरण्यासाठी अंदाजे पाच वाजता दरम्यान आले असता त्यानंतर भावली डॅमच्या पाण्यामध्ये खेळत असताना बुडून मरण पावले आहेत. मृतदेह डॅममधुन काढून ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे आणले आहेत.