नाशिक विभागाचा बारावीचा निकाल 94.71 टक्के
नाशिक: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागाच निकाल 94.71टक्के लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टक्केवारीबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, मुंबई 91.95 (सर्वात कमी), कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36, कोकण 97.51 टक्के कोकण विभाग यंदाही निकालात अव्वल आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी1 वाजता हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.