हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या

हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या

मनमाड : प्रतिनिधी

-मनमाड नांदगाव महामार्गावर मनमाड नजीक असलेल्या हिसवळ जवळ एका ट्रक चालकाने जवळपास 45 ते 50 मेंढ्या चिरडल्या व तेथून गाडी घेऊन धूम ठोकली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मनमाड पोलीस ठाण्यात फोन केला पोलीस व स्थानिक नागरिकांनी मनमाड चौफुली येथे ट्रक पकडला व त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नांदगाव महामार्गावर हिसवळ येथे मेंढपाळाच्या जवळपास 45 ते 50 मेंढ्या एका ट्रकने चिरडल्या व तेथुन धूम ठोकली स्थानीक नागरिक दत्तू पवार व इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ट्रकचालकांबाबत मनमाड पोलीस ठाण्यात माहिती दिली काही तरुण ट्रक मागे पाठलाग करत आले व मनमाड पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेऊन मालेगाव चौफुली येथे ट्रक पकडला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन गरीब मेंढपाळला न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 

मेंढपाळ परिवाराला नुकसान भरपाई मिळावी..?

सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात हिट अँड रनच्या घटना मध्ये वाढ झाली असून आज अशीच घटना मनमाड-नांदगावं मार्गांवर हिसवळ जवळ घडली असून भरधावं वेगाने जाणाऱ्या ट्रक तब्बल 30 ते 35 मेंढया चिरडून फरार झाला मात्र परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला मनमाडच्या चौफुलीवर पकडून पोलिसांच्या हवाली केले.अपघातात मोठया प्रमाणात मेंढया दगावल्यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र या मेंढपाळ वर जे संकट ओढवले त्याला यातुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले ती भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *