नाशिक : प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारातच एका विवाहित महिलेने हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आमिष दाखवून विवाहितेकडून एक लाख रुपये घेतले या तरुणाविरुद्ध चिठी लिहून सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारात तिने हाताची नस कापून घेतली यावेळी तेथे असलेल्या नागरिक व पोलीस ठाण्यात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.