नाशिक : प्रतिनिधी
‘आयमा’तर्फे नाशकात आयोजित चार दिवसांच्या ‘आयमा इंडेक्स-2025’ या विराट औद्योगिक कुंभाला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि यामुळे नाशिकला गुंतवणुकीचा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला ओघ हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘न भूतो, न भविष्यती’ असेच या प्रदर्शनाचे वर्णन करावे लागेल. या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद तर लाभलाच, परंतु गेल्या तीन दिवसांत 50 हजारांहून अधिक लोकांनी प्रदर्शन बघण्यास गर्दी केल्याने आयोजकांना सुखद धक्काच बसला आहे.
375 हून अधिक उद्योजकांनी यात सहभाग नोंदविला होता. बी टू बी अंतर्गतच्या बैठका, खरेदीदार आणि वेंडर्स यांच्यात प्रत्यक्ष घडवून आणलेली चर्चा तसेच या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसांत कोट्यवधीची गुंतवणूक नाशकात येण्याची बळावलेली शक्यता तसेच राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती. ‘एचएएल’च्या उच्चपदस्थ अधिकार्यांनी त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी नाशिकच्या उद्योजकांचे पाठबळ लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केल्याने उद्योजकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे उद्योजकांना चांगले दिवस येतील असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
प्रदर्शनाचे औचित्य साधून आयोजकांनी नाशकातील उद्योग क्षेत्राच्या विकासाबाबत विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी आणि मान्यवर उद्योजक यांच्याबरोबर चर्चासत्राचे आयोजन करून त्यांची मते जाणून घेतली. सर्वांनीच नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत भरीव योगदान देण्याचे अभिवचन देतानाच सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली. आयमाने नाशिकला औद्योगिक क्षेत्रात विविध उंचीवर नेऊन ठेवल्याचे सांगताना ‘आयमा’चे विद्यमान अध्यक्ष ललित बूब आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.
कनेक्ट, कोलॉब्रेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशिन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू, आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन, खास आकर्षण म्हणजे ईव्ही व एआयची विविध प्रकारची उत्पादने तसेच ईव्ही वाहने आणि एआय उत्पादने याविषयी 375 हून अधिक स्टॉल्स आहेत. नावीन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उदयोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधीही लोकांना उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, ‘आयमा इंडेक्स महाकुंभ-2025’चे चेअरमन वरुण तलवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, सहसचिव योगिता आहेर, सहसचिव हर्षद बेळे, खजिनदार गोविंद झा, आयपीपी निखिल पांचाळ, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, मनीष रावळ, रवींद्र महादेवकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन डरंगेधीरज वडनेरे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवि शामदासांनी, विनोद कुंभार, श्वेता चांडक, अलोक कानांनी, नागेश पिंगळे, करणसिंग पाटील, रणजित सानप, सूरज आव्हाड, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे आदी विशेष परिश्रम
घेत आहेत. दरम्यान, रविवारी प्रदर्शन बघणार्या मान्यवरांमध्ये धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, म्हाडाचे क्षेत्रीय अध्यक्ष रंजन ठाकरे, कामगार उपायुक्त विकास माळी, इनोव्हा रबरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन आंबर्डेकर, कोसाचे व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता, जेएसडब्ल्यू/ एसएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप भट्टाचार्य, वाहतूक संघटनेचे नेते राजेंद्रनाना फड आदींचा समावेश होता.
सोमवारी समारोप
दरम्यान, चार दिवसांच्या या औद्योगिक महाकुंभाचा समारोप सोमवार, दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्यांनी अजून प्रदर्शन बघितले नसेल, त्यांनी अवश्य हे प्रदर्शन बघावे, असे आवाहन प्रदर्शनाचे चेअरमन वरुण तलवार यांनी केले.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…