कराडजवळ पर्यटक बसचा भीषण अपघात; 40-45 विद्यार्थी-शिक्षक जखमी
नाशिक – प्रतिनिधी
पुणे–बेंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत नाशिकमधील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस भीषण अपघातग्रस्त झाली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची ही बस जवळपास 20 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात सुमारे 40 ते 45 विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले असून त्यांना तातडीने कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
सकाळी सुमारे 6.45 वाजता हा अपघात घडला. कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाठार-ब्रीज परिसरात पुलाचे काम सुरू असताना बसचा तोल जाऊन ती खाली कोसळली. दुर्घटनाग्रस्त वाहन क्रमांक MH 04 GP 0920 असून ती खाजगी ट्रॅव्हल्सची बस असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. जखमी विद्यार्थ्यांवर कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…