राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या 555 जणांचा मृत्यू

तेहरान :
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा सोमवारी (दि.2) तिसरा दिवस होता. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतरही इराणने क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणी रेड क्रेसेंट सोसायटीने सोमवारी सांगितलं की, इराणला लक्ष्य करून अमेरिका-इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत किमान 555 नागरिकांचा मृत्यू झाला,तसेच युद्धात आतापर्यंत 131 शहरांवर हल्ला केला आहे.

संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, बहरीन आणि कुवेत यांसारख्या देशांमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ले करत आहेत. रुग्णालये, टीव्ही स्टेशन आणि इतर इमारतींना लक्ष्य करत आहेत, असे सोमवारी इराणी सरकारी टीव्हीने वृत्त दिले आहे. तसेच इराण सध्या 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि सात दिवसांची सुट्टी पाळत आहे.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर, त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधानांनी दोन्ही देशांवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि दोन्ही देशांमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत चर्चा
केली.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचे सरकारी टेलिव्हिजनने म्हटले आहे. ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस 4 ची 11 वी लाट बेरशेवा येथील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह सुरू आहे.

हजारो प्रवासी अडकले; अनेक उड्डाणे रद्द

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे देशातील प्रमुख विमानतळांसह मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे रद्द केली आहेत. इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. मुंबईहून मक्का-मदीनाला उमरासाठी जाणारे प्रवासीही अडकले आहेत. याशिवाय अबू धाबी, बहरिन आणि इटलीला जाणारे प्रवासी खोळंबले आहेत. मुंबई बाहेरून आलेल्या प्रवाशांची सोय विमान कंपन्यांनी केली आहे. मुंबई विमानतळावरुन अमेरिका आणि युरोपला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.

555 Iranians killed in US-Israeli attack

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago