राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

एलपीजीचा मोठा साठा घेऊन ‘शिवालिक’ जहाज मुंद्रा बंदरात दाखल

नवी दिल्ली :
मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. कतारमधून मोठ्या प्रमाणात एलपीजी घेऊन निघालेले भारतीय जहाज ’शिवालिक’ सोमवारी सायंकाळी पाच वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले. मध्यपूर्वेतील संघर्षमय परिस्थितीनंतर पर्शियन आखातातून भारतात पोहोचणारे हे पहिलेच मोठे गॅसवाहू जहाज ठरले आहे.
नौवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शिवालिक हे जहाज सुमारे 45,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात दाखल झाले आहे. हा साठा किती मोठा आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, हे प्रमाण साधारणपणे 32 लाख घरगुती गॅस सिलिंडर भरण्यासाठी पुरेसे आहे. 14 मार्च रोजी या जहाजाने अत्यंत संवेदनशील समजली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली.
नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन आखातात भारताच्या 22 जहाजे अडकली आहेत. या जहाजांवर एकूण 611 भारतीय खलाशी कार्यरत असून ते सर्व पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या 24 तासांत या भागात कोणतीही विपरीत घटना घडली नाही. सरकार प्रत्येक जहाजाच्या आणि कर्मचार्‍यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले
जात आहे.
एलपीजीपाठोपाठ भारताची कच्च्या तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ’जग लाडकी’ हे जहाज देखील भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. हे जहाज 14 मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीमधून भारताकडे निघाले आहे. 17 मार्ज रोजी मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सचिव सिन्हा यांनी दिली.

Ship ‘Shivalik’ arrives at Mundra port with large stock of LPG

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

3 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

3 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

3 hours ago