नाशिक

नायलॉन मांजाचे 58 गट्टू जप्त

 

 

 

 

 

सिडको (वार्ताहर)

 

अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केवल पार्क परिसरात एका इसमांकडून 42,500 रुपयाचे नायलॉन मांजाचे 58 गट्टू जप्त करण्यात आले.

0

नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा खरेदी विक्री  मांजा साठा वापर करण्याचा मनाई आदेश असताना  अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस प्रवीण राठोड यांना  गोपनीय माहिती मिळाल्यानुसार,की हिंदुस्तान बेकरी मागे, खाडी,केवल पार्क,अंबड येथे पत्राच्या शेडलगत एक  इसम नायलॉन मांजाची विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे सपोनि गणेश शिंदे, पोलीस शिपाई  मुकेश गांगुर्डे, तुषार देसले,योगेश शिरसाट, सचिन करंजे,तुषार देसले, समाधान शिंदे,यांनी  सापळा रचून सदर ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणारा इसमास सोहेल  स्वाले  खान( 22) वर्ष रा. हिंदुस्तान बेकरी मागे,खाडी,केवल पार्क रोड अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 42,500 रुपये किमतीचा नायलॉन मांजा चे 58 गट्टू जप्त करण्यात आले असून अंबड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे मा. पोलीस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी परिमंडळ,02सहा.पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ,नाशिक रोड विभाग, अति. कार्यभार सहा. पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर( गुन्हे) यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे पुढील तपास  उमाकांत टिळेकर व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर बरशिले हे करीत आहेत.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

10 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

10 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

10 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

10 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

10 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

11 hours ago