सिडको (वार्ताहर)
अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केवल पार्क परिसरात एका इसमांकडून 42,500 रुपयाचे नायलॉन मांजाचे 58 गट्टू जप्त करण्यात आले.
0
नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा खरेदी विक्री मांजा साठा वापर करण्याचा मनाई आदेश असताना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस प्रवीण राठोड यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार,की हिंदुस्तान बेकरी मागे, खाडी,केवल पार्क,अंबड येथे पत्राच्या शेडलगत एक इसम नायलॉन मांजाची विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे सपोनि गणेश शिंदे, पोलीस शिपाई मुकेश गांगुर्डे, तुषार देसले,योगेश शिरसाट, सचिन करंजे,तुषार देसले, समाधान शिंदे,यांनी सापळा रचून सदर ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणारा इसमास सोहेल स्वाले खान( 22) वर्ष रा. हिंदुस्तान बेकरी मागे,खाडी,केवल पार्क रोड अंबड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 42,500 रुपये किमतीचा नायलॉन मांजा चे 58 गट्टू जप्त करण्यात आले असून अंबड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे मा. पोलीस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी परिमंडळ,02सहा.पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ,नाशिक रोड विभाग, अति. कार्यभार सहा. पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर( गुन्हे) यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे पुढील तपास उमाकांत टिळेकर व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर बरशिले हे करीत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…