नाशिक

खरात प्रकरणातील पीडितांच्या गर्भपातासाठी डॉक्टरांची मदत

नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे काही केल्या संपण्यास तयार नाहीत. लैंगिक शोषण केलेल्या महिलांचे गर्भपात करण्यासाठी खरात नाशिकमधीलच काही डॉक्टरांची मदत घेत असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे. यात महापालिकेच्या सेवेत असलेला एक डॉक्टरही सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता खरातला महिलांच्या गर्भपातासाठी मदत करणार्‍या शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांबरोबरच महापालिकेच्या सेवेत असलेला डॉक्टरही तपास पथकाच्या रडारवर आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कधी शंकराचा अवतार तर कधी स्वत:ला दैवी शक्ती असलेला पुरुष सांगून अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. घरगुती समस्या आणि अडचणी दूर करण्याच्या नावाखाली खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. यातून गर्भवती राहिलेल्या महिलांचा खरातने गर्भपात करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांची मदत घेतली.
अशोक खरात याने स्वतःला दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेक महिलांना जाळ्यात ओढले आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे. या दरम्यान काही पीडित महिलांच्या गर्भपाताचे प्रकार उघडकीस आले असून, हे गर्भपात नेमके कुठे आणि कोणाच्या मदतीने करण्यात आले याचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान काही डॉक्टरांकडून नियमबाह्य पद्धतीने गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक महानगरपालिकेतील एका डॉक्टराचा खरातशी नियमित संपर्क होता. त्याने या प्रकरणात मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच काही खासगी सोनोग्राफी केंद्रांमध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी सुरू आहे.
खरातने शहरातील काही हॉटेल्सचा वापर केल्याचेही तपासात समोर आले असून, त्या अनुषंगाने संबंधित व्यावसायिकाची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठा गदारोळ झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्याच व्यक्तीचे नाव पुढे आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

डॉक्टरांकडून ‘गोळ्यां’चा पुरवठा?

एसआयटीकडून खरात फाइलची सध्या चौकशी सुरू आहे. पथकाने केलेल्या तपासात खरातच्या संपर्कात नाशिकमधील काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्स चालक होते. जेव्हा एखादी पीडित महिला गरोदर राहायची, तेव्हा खरात तिला गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा. नियमबाह्य पद्धतीने या गोळ्या खरातपर्यंत कशा पोहोचल्या? याचा शोध घेतला असता, काही डॉक्टरांनी त्याला या गोळ्या पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

59.27 percent voting in Baramati by-election

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

26 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

39 minutes ago