शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला
♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश
♦ कोयत्याचा धाक दाखवून कुटुंबीयांचे दागिने हिसकावले
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाथरे खुर्द परिसरात चार अज्ञात दरोडेखोरांनी शेतकर्याच्या बंगल्यात घुसून 11 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी (दि. 15) रात्री घडली.
जवळके रस्त्यावरील वारेगाव परिसरातील दवंगे वस्ती येथे रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडेखोरांनी किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. शेतकरी राजेंद्र सीताराम दवंगे (55) यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून कुटुंबीयांना धमकावले. त्यानंतर 50 हजार रुपयांची रोकड आणि 11 लाख 47 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर उसाच्या शेतात पसार झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेंद्र दवंगे यांची जवळके रस्त्यावरील वारेगाव परिसरात दवंगे वस्ती येथे शेतवस्ती आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या आणि अंगाने सडपातळ असलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी बंगल्याच्या किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दवंगे यांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवत घरातील सदस्यांना गप्प राहण्यास भाग पाडले.
या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. शेतवस्तीवर झालेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरोडेखोरांनी दवंगे यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेली 50 हजार रुपयांची रोकड, पत्नी अनिता यांचे सोन्याचे दागिने, मुलगा आकाश याचे चांदीचे ब्रेसलेट आणि बहीण लंकाबाई यांचे सोन्याचे दागिने लुटले. हॉलमध्ये झोपलेल्या अनिता, मुलगी अंकिता आणि लंकाबाई यांच्या गळ्यातील दागिनेही बळजबरीने काढून घेतले. अंकिता धनवटे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत कापून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरोडेखोरांनी सोन्याच्या पोती, मण्यांची पोत, अंगठ्या, कानातील झुबे, डोरले आणि चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 11 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यात 50 हजार रुपयांची रोकड मिळून एकूण 11 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला.
दरम्यान, दवंगे यांच्या वस्तीवर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी साहिल चांगदेव गिते यांच्या वस्तीवर चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, शेतकरी जागा असल्याने आरडाओरडा झाला. त्यामुळे दरोडेखोर तेथून पसार झाले आणि त्यानंतर त्यांनी दवंगे यांच्या वस्तीवर दरोडा टाकल्याचे समजते.
श्वानपथक, न्यायवैद्यक पथकाकडून तपास
दरोड्याची माहिती रात्री बाराच्या सुमारास वावी पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने सुमारे पंधरा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला. रात्रीच श्वानपथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी के. के. पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.
Armed robbery in Pathre Khurd
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…