नाशिक

गोंदेजवळ आयशरची कारला धडक; 5 म्हशी ठार

सिन्नर : प्रतिनिधी
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्‍या आयशरने डाव्या बाजूला चालणार्‍या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयशरमधील 5 म्हशी ठार झाल्या असून, एक म्हैस गंभीर जखमी झाली. तर कारमधील एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.8) पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अपघातांच्या मालिकांमुळे कलंकित झाला असून, या महामार्गावरून अवैधरीत्या जनावरांची वाहतूक सर्रास होत असल्याचे या अपघाताने उघडकीस आली आहे.
नागपूर येथून 21 म्हशी घेऊन देवनार-मुंबईकडे भरधाव वेगात जाणार्‍या आयशर (क्र.एमएच-03, ईजी-1831) गोंदे शिवारात चॅनल नं. 566.2 आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशरने महामार्गावर डाव्या बाजूने मुंबईकडे जात असलेल्या कारला (क्र. युपी-66, एबी-3157) धडक दिली. या अपघातात आयशरमधील 5 म्हशी जागीच ठार झाल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. तसेच कारमधील राजेंद्रकुमार राजकिशोर पांडे हे देखील गंभीर जखमी झाले.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago