नाशिक

एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघातात मृत्यू

जयपूर :

एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जयपूरच्या जमवारामगडमध्ये ही घटना घडली. या अपघातामध्ये इंजिनिअर तरुण, त्याची पत्नी, आई-वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास जमवारामगढ येथील रायसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनोहरपूर-दौसा हायवेवर झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रेलरखाली कार घुसली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्वाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago