नाशिक

घंटागाडी ठेकेदारांना 6 कोटींचा दंड

 

 

नाशिक : गोरख काळे

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने दीडशे कोटी खर्च करुन घंटागाडीचा ठेका दिला होता. दरम्यान वेळेत घंटागाडी न जाणे, ब्लॅक स्पॉटवरील कचरा न उचलणे, गाडीच घेउन न जाणे यासह विविध तक्रारीवरुन पालिकेने घंटागाडी ठेकेदारांना मागील सहा वर्षात 5 डिसेंबर 2016 ते 31 जुलै 2022 पर्यंत तब्बल 6 कोटी 22 लाख 18 हजार 2%% रुपये एवढी दंडात्मक कारवाइ करत दणका दिला आहे.

महापालिकेत लवकरच नव्याने घंटागाडी ठेका दिला जाणार आहे. विशेषत: मागील जुना घंटागाडीचा ठेका दीडशे कोटींपर्यत होता तोच ठेका आता साडे तीनशे कोटींपर्यत गेल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी हा पालिका वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान सध्या जुन्याच घंटागाडी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सिडको विभाग अंतर्गत सर्वाधिक 2 कोटी 15 लाख 1% हजार 230 एवढी दंडात्मक कारवाइ करण्यात आलेली आहे. त्याखालोखाल पंचवटी विभागात 1 कोटी %8 लाख 46 हजार 516 रुपये एवढ्या रकमेचा दंड केला आहे. घंटागाडीद्वार्रे शहरातील प्रत्येक घरातील कचरा घेणे आवश्यक आहे. तसेच जी वेळ ठरवून दिली आहे. तेव्हा घंटागाडी गेली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी असलेले कचर्‍याचे ढीग दररोज उचलणे, उद्यान, हॉटेल मधील कचरा उचलणे आदी ठिकाणचा कचरा उचलण्याची जबाबदारी घंटागाडी ठेकेदारांवर आहे. घंटागाडीला जीपीएस सिस्टीम असल्याने त्यानुसार काम सुरु असल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, पश्‍चिम, पूर्व महापालिकेच्या या सहाही विभागांमध्ये घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. कुठेही कचरा उघड्यावर दिसू नये, नागरिकांनी रस्त्यावर कचरा न फेकता त्यांना घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान पालिकेच्या घनकचरा विभागाने घंटागाडीबाबत आलेल्या तक्रारी आणि केलेल्या पाहणीत आढळून आलेल्या त्रुटींवरुन सहा कोटींचा दंड ठोठावला आहे.

 

 

चौकट….

 

विभागानुसार कारवाई

 

नाशिकरोड : 30 लाख 10 हजार %02

ना. पूर्व : 81 लाख 10 हजार 430

सातपूर  : 58 लाख 86 हजार 212

पंचवटी : 1 कोटी 78 लाख 46 हजार 596

सिडको : 2 कोटी 15 लाख 17 हजार 230

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

11 hours ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

1 day ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

1 day ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago