हरविलेले 603 मोबाइल मूळ मालकांच्या स्वाधीन

नाशिक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर पोलिसांनी हरविलेले मोबाइल शोधून त्यांच्या मूळ मालकांपर्यंत सुपूर्त करण्याची मोठी मोहीम राबवली असून, तब्बल 1 कोटी 13 लाख रुपये किमतीचे 603 मोबाइल हॅण्डसेट मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाइल शोध विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मोबाइलचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीसह मानवी कौशल्याचा वापर करून गहाळ मोबाइल शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी नोंदवलेल्या मोबाइल चोरी किंवा गहाळ होण्याच्या तक्रारींचे विश्लेषण करून, मोबाइल शोध पथकाने तांत्रिक पद्धतीने मोबाइलचा मागोवा घेतला आणि यशस्वीरीत्या 603 मोबाइल मूळ मालकांपर्यंत पोहोचवले.
दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर येथे आयोजित ‌‘हरविलेले मोबाइल सुपूर्त कार्यक्रम‌’दरम्यान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हे मोबाइल नागरिकांना परत देण्यात आले.
यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित नागरिकांनी मोबाइल मिळाल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आणि त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर पाटील यांनी केले. या कामगिरीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-1) मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-2) किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि मोबाइल शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, परिक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख, पूनम नाईक, शरद पाटील, प्रियंका कवाद, विशाल जाधव, निखिल कोरपड, सपना पुरी, राहुल काकडे, प्रदीप पवार, योगेश साळुंखे, हर्षद महाले, अमोल टले, योगेश वाजे, गणेश रूमाले, सुशील देशमुख, गणेश पगार, भूषण पवार, संदीप बर्डे, दीपक भुजबळ, जिजा भुसारे, श्रीकांत साळवे, मंगेश्वर काकुळदे, राजेंद्र दिवे, समीर शेख, तुलसीदास चौधरी, आशा धुळे, आरती बागूल, राहुल जगझाप, श्यामल जोशी, गौरव गवळी, राहुल मेहेंदळे, संदीप नागरे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *