नाशिक

‘स्टाइस’मध्ये होणार 69,500 वृक्षांची लागवड

15 किमी रस्त्यांच्या दुतर्फा आणि 5.5 एकर जागेत घनदाट जंगल उभारणार

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत तथा स्टाइसच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाकांक्षी हरित उपक्रमाला प्रारंभ झाला असून, मियावाकी पद्धतीने तब्बल 69 हजार 500 वृक्षांची लागवड केली
जाणार आहे.
सामाजिक वनीकरण विभाग सिन्नर, मुसळगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि स्टाइस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमातून 15 किलोमीटर रस्त्यांच्या दुतर्फा तसेच 5.5 एकर खुल्या जागेत घनदाट हरित पट्टा निर्माण केला जाणार आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी गणेश रणदिवे, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश पाटील, विद्यमान वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा रक्ताटे, तत्कालीन वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र भोकरे, विद्यमान वनपरिमंडळ अधिकारी सुनील झोपे यांचे सहकार्य लाभले. स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने
पाठपुरावा केला.
गेल्या तीन वर्षांपासून स्टाइसने सामाजिक वनीकरण विभागाकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. जिल्हा उद्योग मित्र समितीचे तत्कालीन अध्यक्ष तथा तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून या प्रस्तावाला गती मिळाली. औद्योगिक परिसरातील हरित क्षेत्र वाढविण्याबरोबरच प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आणि पर्यावरणपूरक औद्योगिक वसाहत विकसित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत 5.5 एकर खुल्या जागेत मियावाकी पद्धतीने 66 हजार रोपे लावली जाणार आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीतील 15 किलोमीटर लांबीच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा आणखी 3 हजार 500 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. एकूण 69 हजार 500 वृक्षांमुळे संपूर्ण परिसर हिरवागार होणार आहे.
या प्रकल्पामुळे औद्योगिक परिसरातील कार्बन व धूळकणांचे प्रमाण कमी होण्यास, तापमान नियंत्रणात राहण्यास, भूजल पातळी वाढण्यास तसेच पक्षी व जैवविविधतेसाठी अनुकूल अधिवास निर्माण होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, हरित वातावरणामुळे उद्योगांना पर्यावरणपूरक मानके पूर्ण करण्यासही हातभार लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्टाइस औद्योगिक वसाहतीला इको-फ्रेंडली इंडस्ट्रियल पार्क अशी नवी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, या उपक्रमाचे उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.

69,500 trees to be planted at ‘STICE’

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago