नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटी व मानदंड सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ डिसेंबरला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी ५ या दरम्यान गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एच. सपट इंजिनिअरींग कॉलेज, नाशिक या ठिकाणी मेळावा होणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्यात नामांकित कंपन्या व नियोक्ते या दिवशी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेतील. तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. त्याद्वारे कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाईल. तर अडचण आल्यास ०२५३ – २९९३३२१ या दूरध्वनीवर संपर्क करावा. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी सांगितले. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…