उदगीर : विनायक कुलकर्णी
ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, भारतीय संविधान ग्रंथ, आणि नामजयघोषात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सकाळी सुरूवात झाली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांचा सोहळा आजपासून सुरू झाला.
संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, ना. संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीची सुरुवात ग्रंथपूजनाने झाली.
दिंडीत महाराणी जीजामाता, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेत अनुक्रमे गीतांजली रेड्डी, प्रेरणा रेड्डी आणि संस्कार रेड्डी हे अश्वारूढ होते. डोईवर कलश, तुळस घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील महिलादेखील दिंडीच्या रंगसंगतीत भर घालत होत्या. रंगीत फेटेधारी पुरूषांसह महिलांचा सहभाग, नवरसांची संकल्पना घेऊन नऊ रंगांच्या टोप्याधारी विद्यार्थी, विठूनामाच्या गजरात टाळ मृदंगासह नृत्य करणारी बालगोपाळ मंडळी, महाराष्ट्राच्या मैदानी खेळांतील शारीरिक कवायतींचे प्रदर्शन करणारे सैनिकी शाळेचे विद्यार्थी, जय हिंद स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक गुगळ नृत्य, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक असे देखणे चित्र उदगीरच्या पथकावर पहायला मिळाले तर मोराचा चित्ताकर्षक चित्ररथ लक्षवेधक ठरला.
ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची वाहनधारी रॅली. यात 11 बुलेटधारी महिला तसेच स्कूटीवरील 120 महिला आणि 120 पुरूष सायकलींसह सहभागी होते. मराठवाड्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक इतिहास दर्शविणारे विविध संदेशात्मक चित्ररथ ग्रंथदिंडीत होते. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडी सहभागी होते.
ठिकठिकाणी माय मराठीचा जल्लोष, फुलांच्या रांगोळ्या, रंगांच्या पायघड्यांनी संभेलनस्थळाकडे जाणारा मार्ग सुशोभित करण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरूषांसह दिंडीत सहभागी समस्त मान्यवर झाले.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…