केंद्राकडून 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी
लासलगाव:-समीर पठाण
केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.
तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती.मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता.त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही ? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.
जेएमसीटी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल वडाळा गांव: …
नांदगांव: प्रतिनिधी प्रत्यक्ष व फोनद्वारे शारीरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना…
ठेंगोडा येथील तलाठी, मंडल अधिकार्यावर लाचप्रकरणी गुन्हा तक्रारदाराकडे मागीतले पंधरा हजार नाशिक : प्रतिनिधी सातबारा…
लासलगावात शेतकरी पुन्हा आक्रमक; शोले स्टाईल आंदोलन करत कांद्याचे लिलाव पाडले बंद समीर पठाण :-…
मनमाडला गायी तस्कर करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा अपघात एक पोलीस व तस्कर जखमी....! मनमाड…
नाशिक: प्रतिनिधी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिकल्याचा जल्लोष साजरा करताना फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी मुळे कॉलेजरोड वरील…