केंद्राकडून 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी
लासलगाव:-समीर पठाण
केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.
तीन दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती.मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता.त्यामुळे त्या सगळ्या राज्यांनी केंद्राला प्रश्न विचारला होता की आम्ही कांदा निर्यात का करू शकत नाही ? यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता कांदा UAE,मॉरिशस,भूतान, बाहरीन,श्रीलंका,बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.