मृतदेह जाळला ग्रामपंचायत कार्यालयासमोर
चांदवड वार्ताहार
तालुक्यातील खडकजांब येथे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न चिघळला असून या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु असल्याने दोन स्मशानभुमी असून रस्ता नसल्याने हा वाद मिटत नसल्याने खडकजांब येथील ग्रामस्थांनी संतप्त होत मृतदेह आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरच जाळला . याबाबत काल खडकजांब येथील आदिवासी तरुण अमोल अशोक कोकाटे ( 25) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास मच्ंिछंद्र कराड हे करीत आहेत. दरम्यान या खडकजांब येथील स्मशानभुमीचा प्रश्न गेल्या आठ ते दहा महिन्यापासून चांगला गाजत आहे. याप्रकरणी काही नागरीकांनी स्मशानभुमीला रस्ता नसल्याने उपोषण केले . तहसीलदार कार्यालय व वरिष्ठाकडे ही बाब असतांना या प्रश्नी न्यायालयात वाद सुरु आहे. नवीन स्मशानभुमी बांधली मात्र तेथेही जाण्यासाठी रस्ता नसल्याने या तरुणांचा मृतदेह ग्रामस्थांनी संतप्त होत दि. 16 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळला यावेळी सरपंच पुजा अहिरे, उपसरपंच नाना गुंजाळ, ग्रामसेवक अजय पुरकर व ग्रामपंचायत सदस्यांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाळु नये अशी विनंती केली मात्र संतप्त ग्रामस्थांनी अखेर मृतदेह ग्रामपंचायती समोरच जाळल्याने काही काळ वातावरण चांगले तापले होते.