शिंदेगावात बैलगाडा शर्यंतींचा थरार रंगला

शिंदेगावात बैलगाडा शर्यंतींचा थरार रंगला

शिंदे।  वार्ताहर

येथील ग्रामदैवत रेणुकामाता यात्रा उत्सावानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन रेणुकामाता फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी केले होते. पंचक्रोशीतील नागरिकांना शिंदेगावात अनेक वर्षांनंतर शर्यतींचा थरार अनुभवास मिळाला.
शिंदे गावात गेली१०ते१५वार्षांपासुन प्रथमच बैलगाडा शर्यतींचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य तथा रेणुका फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी केले होते. याप्रसंगी तब्बल१५०पेक्षा जास्त बैलगाडा मालक जिल्हाभरातुन सहभागी झाले होते. त्यात १००हुन अधिक शर्यती पार पडल्या.३००ते५००रुपये बक्षीसां पासून सुरु झालेल्या शर्यती रुपये ११०००बक्षीसां पर्यंत पोहचल्या.शर्यतीसाठी भुसे,तळवाडे,पळसे,शिवडे,जाखोरी,नायगाव, चांदगीरी,आडगाव, वडांगळी,नारायणटेंभी,डुबेरेवाडी,सावळी,मोह,खोपडी,कोटमगाव,आदी नावाजलेले बैलगाडा खेळ सहभागी झाले होते. यावेळी शर्यतीत वस्तुरुपात रेंझर सायकली बक्षीस देण्यात आले. शर्यतीच्या शेवटी मानच्या शर्यत रोख ११०००व रेंझर सायकल या बक्षीसावर घेण्यात आली. शर्यतींचा थरार बघण्यास खासदार हेमंत गोडसे,माजी आमदार योगेश घोलप, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के, सरपंच गोरख जाधव, युवासेना तालुका प्रमुख नवनाथ गायधनी, संजय तुंगार,बाजीराव जाधव,कैलास भांगरे, गणपत जाधव,माजी सरपंच रतन जाधव,बाळासाहेब जाधव, सुदाम जाधव, नितिन जाधव,ज्ञानेश्वर मते,ज्ञानेश्वर जाधव, आदिंसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
शर्यती यशस्वीतेसाठी रेणुका माता फाऊंडेशन, आंगद फाऊंडेशन, शिव जन्मोत्सव समिती सह किरण बेदडे,भास्कर तुंगार, संदिप बेदडे, सुभाष काकड,सुरेश जाधव, संतु बंदावणे,प्रकाश साबळे, संतोष बेदडे ,सागर बंदावणे, अनिल बोराडे, सोनु साळवे, विलाससाळवे,राहुल वाळुंज,प्रशांत काकड आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *