व्हॅलेन्टाइन प्लॅनिंगमध्ये तरुणाई गुंतली

नाशिक: प्रतिनिधी
व्हॅलेन्टाईन वीकला सुरूवात झाली आहे. प्रेमी युगलाकडून विविध डे साजरे करण्यात येत आहेत. आपल्या जवळ्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू देण्यासाठी गिफ्ट शॉप सजले आहेत. अनेकांकडून व्हॅलेन्टाईन डे चे प्लॅनिंग करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील  गिफ्ट शॉपवर तरूण वर्गाकडून गर्दी केली जात आहे. व्हॅलेन्टाईनप्रमाणे व्हॅलेन्टाईन वीकमधील प्रत्येक दिवस खास असल्याने त्या-त्या डे निमित्त भेटवस्तूंची खरेदी केली जात आहे. त्यात टेडी, चॉकलेट,फोटो कोलाज,  वॉच , वॉलेट, बॉटल नोट,एलईडी हार्ट शो पीस, फोटो कुशन,  परफ्युम यासारख्या भेटवस्तू देण्याकडे तरूणाईंचा कल आहे. तर व्हॅलेन्टाईनला डेस्टिनेशन डेटला प्राधान्य दिले जात आहे. मागील दोन वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महाविद्यालये बंद होती. मात्र, सध्या महाविद्यालयात व्हॅलन्टाइनचे वारे वाहू लागले. त्यामुळे तरुणाई अक्षरश: प्रेमाचा उत्सव साजरा करत असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावर व्हॅलेन्टाइनचे रंग
सोशल माध्यमांवर तरूण तरुणींसह  विवाहित दाम्पत्य , मध्यमवयीनांकडून आपल्या प्रियजनांना स्टेटस, स्टोरी, मेसेजमधून व्हॅलेन्टाईन वीकमधील प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.
महागाईचा फटका
व्हॅलेन्टाइनसाठी आकर्षक असे गिफ्ट करताना तरूणाईचा खिसा रिकामा होत आहेत. विविध वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे व्हॅलेन्टाइन चांगलाच महागडा होत असल्याचे चित्र आहे. व्हॅलेन्टाईन्ट वीक निमित्त तरूण तरुणींची  हॉटेल्स , कॉफी शॉपवर गर्दी होत आहे.तर खास व्हॅलेन्टाईन्टसाठी  कॅफे आणि कॉफी शॉप चालकांकडून विविध ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *