रुद्राक्षाबद्दल घ्या जाणून

नाशिक ः देवयानी सोनार
हिंदू धर्मीय भक्तीच्या मार्गावर मनशांती, दुःखनिवृत्ति आणि ध्यान,धारणा आणि समाधी सोबत लौकिक आणि पारलौकिक लाभ मिळावे ,त्यांची प्राप्ती व्हावी म्हणून अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतो.रुद्राक्षाबद्दल जाणून घेता येईल

 

 

रुद्राक्ष म्हटले कि डोळ्यासमोर महादेवाचे तृतीय नेत्र येते परंतु रुद्राक्ष निर्मितीची कथेत सांगितल्याप्रमाणे महादेवाचे तृतीय नेत्र अश्रूंपासून निर्माण झाले अशी मान्यता आहे.
धकाधकीच्या जिवनात मानसिक शांती मिळविणसाठी अध्यात्मिक मार्गाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शिवरात्रीच्या मुहुर्तावर रुदाक्ष धारण करावे असाही मतप्रवाह हिंदूधर्मीयांमध्ये असल्याने शिवरात्रीच्या मुहुर्ताची वाट पाहिली जाते.

 

 

 

 

सध्या रुद्राक्ष धारण करण्याबाबत अनेक माध्यमामधुन संदेश,माहिती प्रसारीत करण्यासह मोङ्गत रुद्राक्षाचे वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे रुद्राक्षाचे महत्व,उपयोग याबद्दल जाणकारांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
हिंदूधर्मीयांमध्ये शिवरात्रीचे महत्व असल्याने यादिवशी विविध शिवमंदिरांमध्ये वा घरी भाविक उत्साहात पूजा,अभिषेक,आरती,उपवास करतात.बिल्वपत्र,दुग्धाअभिषेक करीत जागरण करण्याचीही प्रथा आहे. विविध भक्तिमार्गातील साधुसंत,प्रवचन कारांनी रुद्राक्ष धारण करण्याबद्दल माहिती,कथा सांगितल्या आहेत.

 

 

 

 

मूलतःरुद्राक्षांची हि फळे रुद्राक्षाच्या झाडाला येतात. रुद्राक्षाची उत्पत्ती समुद्र सपाटीपासून दोनहजार मीटर उंची पर्यंत प्राप्त होतात. उष्ण कटिबंध समशीतोष्ण कटिबंधात रुद्राक्षाचे वृक्ष हिमालय, नेपाळ,बंगाल ,आसाम मधील जंगल,हरिद्वार , दक्षिण भारतातील निलगिरी , मैसूर अन्नामलाई , इंडोनेशिया , जावा , सुमात्रा तसेच चीनच्या काहीभागात रुद्राक्ष प्राप्त होतात. हल्ली लोक शिवभक्ती आणि वृक्षप्रेमी देखील रुद्राक्ष वृक्षाची लागवड आपल्या परिसरात करीत असल्याचे दिसते.

 

 

 

रुद्राक्ष कोणीही लहान ,मोठे, स्त्री पुरुष धारण करु शकतो. कुठल्याही धार्मिक जाती विशेषाच्या मर्यादा नाहीत कारण शिव हे पशुपती अर्थात मनुष्य प्राण्यासगट सर्वांचे देव असून ते देवांचेही देव आहेत अशी जाणकारांची मान्यता आहे.

 

 

रुद्राक्ष धारण करण्याचे काय फायदे आहेत? – ग्रंथकार शास्त्रकार सांगतात कि रुद्राक्ष शरीराच्या सुरक्षा चक्राप्रमाणे कार्य करतात, एकाग्रता वाढते, ग्रहांचा कुप्रभाव दूर होतो, ताण तणाव दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते, शरीरातील चक्रांचे संतुलन होते, अध्यात्मिक प्रगती करता साधना करणारे सर्व साधक रुद्राक्ष माळा धारण करतात.

 

 

 

खरा रुद्राक्ष कसा ओळखावा आणि त्याचे किती प्रकार आहेत ? मुख भेदानुसार नेपाळी, इंडोनेशियन आणि भारतीय रुद्राक्ष आहेत. त्यात एक ते 27 मुखापर्यंत रुद्राक्ष आढळतात, परंतु गौरीशंकर , गजगौरी, त्रैजुटी, गणेश रुद्राक्ष आणि एक ते 14 मुखापर्यंतच्या रुद्राक्षाला जास्त मागणी आहे. त्यातही नेपाळी रुद्राक्ष हे जास्त प्रमाणात मागणी असलेले रुद्राक्ष आहेत, खरा रुद्राक्ष हा कुणी पाण्यात बुडवून तपासतात, जर तो बुडला तर खरा आणि तरंगला तर खोटा अशी काही लोकांची मान्यता जरी असली तरी देखील रुद्राक्ष हा लॅब मध्ये टेस्ट करून घ्यावा असे रत्नविशारद सांगतात.

 

 

 

 

रुद्राक्ष कुठल्या रंगाचे असतात कधी धारण करावे? व त्यांची किंमत कशी असते ,? – उत्तम प्रतीचे रुद्राक्ष चाकलेटी,गर्द तपकिरी किंवा खजुराच्या रंगाचे असतात, मध्यम प्रतीचा रुद्राक्ष हल्का चॉकलेटी, मध्यम तपकिरी किंवाबदामाच्या गरासारखा दिसतो, तर काही रुद्राक्ष मातकट आढळतात.

 

 

 

 

,तृतीय दर्जाचे रुद्राक्ष पांढरट, अतिशय हलके तपकिरी रंगाचे आढळतात. बहुतांश रुद्राक्ष गोल असतात तर काही रुद्राक्षों अंडाकार तर काही लांबट व चपटे वकाही अर्ध चंद्राकार आढळतात. वाटाण्याच्या दाण्यापासून ते आवळ्याच्या अकरापर्यंत रुद्राक्ष आढळतात.

 

 

 

 

 

आवळ्याच्या आकाराचा रुद्राक्ष सर्वोत्तम,बोराच्या आकाराचा रुद्राक्ष मध्यम तर चण्या वाटाण्याच्या आकाराचे रुद्राक्ष हलक्या वर्गाचे मानले जातात, परंतु इंडोनेशियातील छोटे रुद्राक्षों सर्वोत्कृष्ट मानले जातात.

 

 

 

 

 

.संदीप नागरे (ज्योतिर्विद्या वाचस्पती)
जेमोलॉजिस्ट,जी. डी. (जी. आय. ए)(अमेरिका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *