नाशिक ः प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्ङ्गे आजपासून(दि.21)बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे.108 केंद्रावर 74 हजार 780विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.मंडळाच्या संकेतस्थळावर हॉल तिकिट उपलब्ध करून ेण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंडळातर्ङ्गे करण्यात आल्या आहेत.कृती आखाड्याद्वारे यंदा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
21मार्च पर्यंत चालणार्या परीक्षेत कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतून नाशिक विभागातूनयंदा एक लाख 62 हजार 612 परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.
कोरोना काळात परीक्षेसाठी जादा अर्धा तास यंदा देण्यात येणार नसून पुर्वीप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.परीक्षा प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना याबाबतीत कळविण्यात आले आहे.
नाशिक विभागवार विद्यार्थी 74 हजार 780 विद्यार्थी ,धुळे 23 हजार 879 ,जळगाव 47 हजार 214 ,नंदुरबार 16 हजार 739 ,एकुण 1 लाख 62 हजार612 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना तणाव जाणवल्यास समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.जिल्हानिहाय समुपदेशकांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहे.नाशिक जिल्हा किंरण बावा(9423184141,9423026302)परीक्षेला जातांना हॅालतिकिट ,शैक्षणिक साहित्य सोबत आठवणीने घेऊन जा.गैरप्रकारांना बळी न पडता परीक्षा केंद्रावर शिस्तीचे पालन करा.असे आवाहन मंडळातर्ङ्गे करण्यात आले आहे.
जिल्हा आणि शाखांनिहाय विद्यार्थी
शाखा नाशिक ……धुळे……जळगाव…..नंदुरबार……एकुण
विज्ञान………34293….13100…22264…9019….78676
कला……….25200….8587…..17495….6643….57925
वाणिज्य…….13237….1520…..5588……..896…21241
एमसीव्हीसी……1995…..671…..1859………161….4686
आयटीआय………..55…….1……….8…………20…….84
एकूण………..74780….23879….47214….16739..162312