थकबाकी वसुलीसाठी गल्लीबोळात जाणार रिक्षा

 

गुरवारपासून मोहिमेला सुरवात अद्याप 41 कोटीचे उदिष्ट

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या उत्पन्नात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र करसंकलन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अपेक्षित थकबाकी वसुली करताना दमछाक होत आहे. दरम्यान आयुक्तांनी 31 मार्चपर्यत घरपट्टीचे 175 कोटी व पाणीपट्टीचे 75 कोटी थकबाकी वसुलीचे उदिष्ट दिले आहे. थकबाकीदारांनी त्यांचा थकीत कर भरावा यासाठी नाशिकच्या सहाही विभागातील गल्यांमध्ये रिक्षा चालवली जाणार असून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाणार आहे.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीस दिवस शिल्लक असून थकबाकी वसुलीसाठी करसंकलन विभागाने पूर्ण जोर लावला आहे. थकबाकीदारांना कर भरता यावा यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही विभागीय व उपविभागीय कार्यालय सुरु ठेवले जाणार आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यापासून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ मोहीम घेण्यात आली. तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा धाडणे, अंतिम सूचनापत्र पाठवणे व मालमत्ता जप्तीचे वारंट जारी करणे आदी कारवाई सुरु आहे. आतापर्यंत 175 पैकी 159 कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. अद्याप 16 कोटींची वसुली शिल्लक आहे. तर पाणीपट्टि थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. 75 कोटींच्या उदिष्टापैकी 50 कोटी 64 लाखाची वसुली झाली आहे. उर्वरीत उदिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या गुरुवारपासून पुन्हा ढोल बजाओ मोहीम सुरु केली जाणार आहे. तसेच थकबाकीदारांनी महापालिकेला सहकार्यकरुन कर भरावा अन्यथा कारवाई केली जाईल हा संदेश देण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक रिक्षा फिरवली जाणार आहे. वरील संदेश असलेली ऑडिओ क्लिप उदघोषकावर वाजवली जाईल. दिवसाला एक रिक्षा शंभर किलोमीटर फिरणार आहे. तीस दिवस शहरातील गल्लीबोळात ही रिक्षा फिरणार आहे. महापालिका करसंकलन विभाग थकित मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ढोल बजाओ या मोहीम सोबतच नागरिकांनी थकबाकी अदा करुन सहकार्य करावे हा संदेश देण्यासाठी गल्लीबोळात रिक्षा फिरवणार आहे. गुरुवारपासून (दि.2) शहरातील सहाही विभागात प्रत्येकी एक रिक्षा गल्लीबोळात फिरवली जाणार आहे. पुढिल 31 मार्चपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. मालमत्ता व पाणीपट्टी असे एकूण 41 कोटींची थकबाकी वसुलीचे करसंकलन विभागाचे उदिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *